कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ पर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार ०६० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४९० ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५३०, बागलाण २९६, चांदवड ३३६, देवळा १४४, दिंडोरी ४४०, इगतपुरी ८८, कळवण २८०, मालेगाव २३८, नांदगाव २४३, निफाड ५०८, पेठ २५, सिन्नर ६७७ , सुरगाणा ४६, त्र्यंबकेश्वर १५, येवला १०८ असे एकूण ३ हजार ९७४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ३९७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १९० तर जिल्ह्याबाहेरील ३० रुग्ण असून असे एकूण ७ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८७ हजार ४८१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९५.६५ टक्के, नाशिक शहरात ९७.५७ टक्के, मालेगाव मध्ये ९५.९१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.७९ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २ हजार ३६४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार ५० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३१७ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ८३० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ८७ हजार ४८१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ७५ हजार ०६० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७ हजार ५९१ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६. ७९ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)