कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५२८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ७११ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७० ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४९, बागलाण ०७, चांदवड २०, देवळा ०७, दिंडोरी २३, इगतपुरी ०४, कळवण १६, मालेगाव ०६, नांदगाव ११, निफाड १०७, पेठ ०१, सिन्नर १२४, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर १०, येवला ५८ असे एकूण ४४३ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०९ तर जिल्ह्याबाहेरील २० रुग्ण असून असे एकूण ७११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ८९५ रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०६, बागलाण ००, चांदवड ०३, देवळा ००, दिंडोरी ०२, इगतपुरी ००, कळवण ००, मालेगाव ००, नांदगाव ०१, निफाड ०८, पेठ ००, सिन्नर २०, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०८ असे एकूण ४८ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.०२ टक्के, नाशिक शहरात ९८.१६ टक्के, मालेगाव मध्ये ९७.०५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ इतके आहे.
*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार १८१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९९२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६५६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
– ४ लाख ९ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ५२८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७११ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)