कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार ४५८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३२४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार २३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ६५, बागलाण ६९४, चांदवड ६६१, देवळा ६०६, दिंडोरी ७६६, इगतपुरी १७६, कळवण ५६५, मालेगाव ४७१, नांदगाव ४५८, निफाड १ हजार २४४, पेठ ६९, सिन्नर १ हजार २१४, सुरगाणा २५१, त्र्यंबकेश्वर १३०, येवला २५६ असे एकूण ९ हजार ६२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ९८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९६ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार ३९८ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९१.६५ टक्के, नाशिक शहरात ९६.०० टक्के, मालेगाव मध्ये ८८.५९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २ हजार ४६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७९७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २९२ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार २३४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ७६ हजार ३९८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ५४ हजार ४५८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १७ हजार ७०६ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)