कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५० हजार ५५५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आत्तापर्यंत ४ हजार १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार १६०, बागलाण ६३३, चांदवड ६३९, देवळा ६१३, दिंडोरी ६८१, इगतपुरी १८१, कळवण ५५८, मालेगाव ३८८, नांदगाव ३१९, निफाड १ हजार १७६, पेठ ८३, सिन्नर १ हजार ३११, सुरगाणा ३१८, त्र्यंबकेश्वर १९३, येवला २६५ असे एकूण ९ हजार ५१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार ६३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३३८ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार २१० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९१.९३ टक्के, नाशिक शहरात ९५.६९ टक्के, मालेगाव मध्ये ८६.६३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २ हजार ०७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७७० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८६ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार १६२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ७३ हजार २१० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ५० हजार ५५५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८ हजार ४९३ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)