– काल कोविड प्रतिबंधक लसीच्या एका दिवसांतील सर्वात जास्त म्हणजे 1 कोटी 33 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
– देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 65 कोटी 41 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
– संपूर्ण ऑगस्ट महिन्यात लसीच्या 18 कोटी 30 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासांत 41,965 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
– सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.15%
– भारतात सध्या 3,78,181 कोविड सक्रीय रुग्ण आहेत
– रोगमुक्ती दर सध्या 97.51% आहे
– गेल्या 24 तासांत 33,964 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,19,93,644 इतकी झाली आहे
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(2.58%) गेले 68 दिवस 3% हून कमी
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.61% इतका नोंदला गेला
– आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 52 कोटी 31 लाख चाचण्या करण्यात आल्या