– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 64.05 कोटी मात्रा देण्यात आल्या
– गेल्या 24 तासात 30,941 नव्या रुग्णांची नोंद
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.13%
– देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,70,640
– रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.53 %
– गेल्या 24 तासात 36,275 कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,19,59,680
– साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.51%) गेले 67 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर 2.22%
– आतापर्यंत एकूण 52.15 कोटी चाचण्या करण्यात आल्या