विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना संसर्गामुळे राज्यात गेल्या दीड वर्षात सर्वच क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. विशेषत : उद्योग-व्यवसाय क्षेत्राबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे देखील मोठे आर्थिक हानी झाली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे. मात्र तिसऱ्या लाटेआधीच महाराष्ट्रात गेल्या तीन आठवडयात सुमारे साडेचार हजार मुले झाली कोरोनाबाधित झाल्याने राज्यातील शाळा, कॉलेज उघडण्याची मावळली आहे.
गेल्या दीड वर्षापासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद असून केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहेत, त्यामुळे राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याकरिता प्रत्यक्षपणे शाळा कॉलेज सुरू व्हावेत, अशी विद्यार्थी आणि शिक्षकांची इच्छा आहे. त्यामुळे सरकारकडे याबाबत वारंवार विनंती करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता दक्षता म्हणून शाळा महाविद्यालय सुरू करण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसरा लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच त्यापूर्वीच ऑगस्टमध्ये गेल्या तीन आठवड्यातच राज्यात सुमारे साडेचार हजार मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे १ सप्टेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर निर्णयाला पुन्हा एकदा स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. तसेच मंदिरे आणि अन्य धार्मिक खुली होण्याची शक्यता मावळली आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला असून तिसऱ्या लाटेआधीच राज्यात २५ दिवसात सुमारे ४ हजार ५०० मुले कोरोनाबाधित झाल्याने राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. सप्टेंबरच्या मध्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे पालकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.