नाशिक – कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 62 लाख 73 हजार 760 डोस प्राप्त झाले होते. त्यापैकी एकूण 59 लाख 81 हजार 803 नागरिकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 20 लाख 35 हजार 729 नागरिकांचे लसीकरण
नाशिक जिल्ह्याला एकूण 22 लाख 03 हजार 460 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 20 लाख 35 हजार 729 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 70 हजार 51 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 41 हजार 637 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 1 लाख 28 हजार 189 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 57 हजार 036 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 4 लाख 61 हजार 231 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 73 हजार 841 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 8 लाख 44 हजार 315 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 3 लाख 59 हजार 429 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण 14 लाख 93 हजार 883 नागरिकांचे लसीकरण
अहमदनगर जिल्ह्याला एकूण 15 लाख 55 हजार 730 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 14 लाख 93 हजार 883 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 44 हजार 881 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 33 हजार 771 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 58 हजार 787 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 25 हजार 083 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 3 लाख 12 हजार 406 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 67 हजार 789 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 6 लाख 32 हजार 373 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 3 लाख 18 हजार 793 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यात एकूण 7 लाख 60 हजार 072 नागरिकांचे लसीकरण
धुळे जिल्ह्याला एकूण 7 लाख 88 हजार 120 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 7 लाख 60 हजार 072 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 16 हजार 982 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 10 हजार 689 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 31 हजार 824 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 12 हजार 174 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 2 लाख 18 हजार 694 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 43 हजार 362 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 2 लाख 93 हजार 515 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 1 लाख 32 हजार 832 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जळगांव जिल्ह्यात एकूण 11 लाख 11 हजार 068 नागरिकांचे लसीकरण
जळगांव जिल्ह्याला एकूण 11 लाख 38 हजार 720 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 11 लाख 11 हजार 068 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 30 हजार 322 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 21 हजार 070 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 63 हजार 591 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 30 हजार 719 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 2 लाख 48 हजार 412 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 30 हजार 313 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 4 लाख 83 हजार 875 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 2 लाख 02 हजार 766 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 5 लाख 81 हजार 051 जणांचे लसीकरण
नंदुरबार जिल्ह्याला एकूण 5 लाख 87 हजार 730 डोस प्राप्त झाले होते त्यापैकी आजपर्यंत एकूण 5 लाख 81 हजार 051 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करणाऱ्या 14 हजार 963 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 9 हजार 999 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या 47 हजार 776 कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला असून 14 हजार 292 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 31 हजार 654 नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 30 हजार 693 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 च्या पुढील 2 लाख 53 हजार 943 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 77 हजार 731 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
(स्त्रोत: उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची दि. 26 ऑगस्ट 2021 रोजीची माहिती )