कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ११ हजार ९५० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३४ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार ७८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ६१३, चांदवड १ हजार ४२, सिन्नर २ हजार ०७, दिंडोरी १ हजार ४२६, निफाड २ हजार ५४६, देवळा १ हजार ३३, नांदगांव ५५९, येवला ४२६, त्र्यंबकेश्वर ३१४, सुरगाणा ४५१, पेठ ११५, कळवण ७४३, बागलाण १ हजार २९४, इगतपुरी ४०४, मालेगांव ग्रामीण ८९० असे एकूण १५ हजार ८६३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ८०१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५६१ तर जिल्ह्याबाहेरील ३२८ असे एकूण ३४ हजार ५५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५० हजार २८७ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८६.१४ टक्के, नाशिक शहरात ९१.०६ टक्के, मालेगाव मध्ये ८४.४७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.३१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.०६ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ७७४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६३९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २७२ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ३ हजार ७८४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :*
– ३ लाख ५० हजार २८७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ११ हजार ९५० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३४ हजार ५५३ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.०६ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)