– राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५८ कोटी २५ लाख मात्रा देण्यात आल्या
– गेल्या २४ तासांत २५,०७२ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, ही गेल्या १६० दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
– सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या १.०३ टक्के इतकी म्हणजेच मार्च २०२० पासूनची आतापर्यंतची सर्वात कमी रुग्णसंख्या
– देशात सध्या ३,३३,९२४ कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या १५५ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
– रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो मार्च २०२० पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर म्हणजे ९७.६३ टक्के आहे
– गेल्या २४ तासांत ४४,१५७ कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले; आता एकूण रोगमुक्तांची संख्या ३,१६,८०,६२६ आहे
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(१.९१ टक्के) गेले ५९ दिवस ३ टक्के हून कमी
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर(१.९४ टक्के) गेले २८ दिवस ३ टक्के पेक्षा कमी
– आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण ५० कोटी ७५ लाख चाचण्या करण्यात आल्या