कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ०८ हजार ३४४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३४ हजार १६६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार ७४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ६५१, चांदवड ९९३, सिन्नर २ हजार १००, दिंडोरी १ हजार ३३२, निफाड २ हजार २९८, देवळा ९९६, नांदगांव ६२७, येवला ४२६, त्र्यंबकेश्वर ३००, सुरगाणा ४३१, पेठ ११५, कळवण ६७६, बागलाण १ हजार २२८, इगतपुरी ४१२, मालेगांव ग्रामीण ८८४ असे एकूण १५ हजार ४६९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ९३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५३७ तर जिल्ह्याबाहेरील २३० असे एकूण ३४ हजार १६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ४६ हजार २५१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८६.२५ टक्के, नाशिक शहरात ९०.९३ टक्के, मालेगाव मध्ये ८४.६२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.०८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.०५ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ७५३ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६२२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २६८ व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ७४१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ४६ हजार २५१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८ हजार ३४४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३४ हजार १६६ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.०५ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)