– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 कोटी 61 लाख मात्रा देण्यात आल्या
– भारतात गेल्या 24 तासांत 34,457 नव्या रुग्णांची नोंद झाली
– सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.12% या मार्च 2020 पासूनच्या नीचांकी पातळीवर
– देशात सध्या 3,61,340 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 151 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
– रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो 97.54% आहे, मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर
– गेल्या 24 तासांत 36,347 जण बरे झाले; आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,15,97,982
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.98%) गेले 56 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.00 %) गेले 26 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 45 लाख चाचण्या करण्यात आल्या