– राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 कोटी 22 लाख मात्रा देण्यात आल्या
– भारतात गेल्या 24 तासांत 36,571 नव्या रुग्णांची नोंद झाली.
– सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.12%; मार्च 2020 पासूनच्या नीचांकी पातळीवर
– देशात सध्या 3,63,605 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 150 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
– रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो 97.54 % आहे,
– मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर आहे.
– गेल्या 24 तासांत 36,555 जण बरे झाले; आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,15,61,635 आहे
– साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.93%) गेले 56 दिवस 3%पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.94%) गेले 25 दिवस 3%पेक्षा कमी
– आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 26 लाख चाचण्या करण्यात आल्या