कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ५६२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३३ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये २१६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ७७७, चांदवड ९६०, सिन्नर २ हजार ४०९, दिंडोरी १ हजार २४१, निफाड २ हजार २२७, देवळा ९६७, नांदगांव ६०७, येवला ३४३, त्र्यंबकेश्वर २७८, सुरगाणा ४२९, पेठ १०९, कळवण ६४८, बागलाण १ हजार २६७, इगतपुरी ३८४, मालेगांव ग्रामीण ८७८ असे एकूण १५ हजार ५२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ४५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६५२ तर जिल्ह्याबाहेरील २०७ असे एकूण ३३ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ४२ हजार ०९१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८६.०४ टक्के, नाशिक शहरात ९१.०६ टक्के, मालेगाव मध्ये ८३.६६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.५१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.०३ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ७३० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६०२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २६२ व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख ४२ हजार ९१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ४ हजार ५६२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३३ हजार ८३७ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.०३ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)