– देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 51.90 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
– भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,86,351; गेल्या 140 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्येच्या 1.21%; मार्च 2020 पासून सर्वात कमी
– सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.45%; आतापर्यंतचा सर्वाधिक दर
– देशभरात आतापर्यंत 3,12,20,981 रुग्ण कोविडमुक्त झाले
– गेल्या 24 तासांमध्ये 40,013 रुग्ण कोविडमुक्त झाले
– गेल्या 24 तासात भारतामध्ये 38,353 नवीन रुग्णांची नोंद,
– साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.34%
– दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.16% असून, हा दर गेल्या 16 दिवसांपासून 3% पेक्षा कमी
– चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ – एकूण 48.50 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत