कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार २०८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४४ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार ८९४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ९३२, चांदवड १ हजार ४६१, सिन्नर १ हजार ६४०, दिंडोरी १ हजार ३७५, निफाड ३ हजार ४२५, देवळा १ हजार २४२, नांदगांव १ हजार ३३, येवला ५३०, त्र्यंबकेश्वर ४१९, सुरगाणा ३९८, पेठ १७९, कळवण ७७५, बागलाण १ हजार ६७७, इगतपुरी ३१५, मालेगांव ग्रामीण ८२९ असे एकूण १७ हजार २३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २५ हजार ३२६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७४८ तर जिल्ह्याबाहेरील २७६ असे एकूण ४४ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख १६ हजार २०७ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८३.१७ टक्के, नाशिक शहरात ८५.७९ टक्के, मालेगाव मध्ये ८२.४३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.३५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.८२ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ५७२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५१०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २४० व जिल्हा बाहेरील ९७ अशा एकूण ३ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ३ लाख १६ हजार २०७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ६८ हजार २०८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४४ हजार ५८० पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.८२ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)