कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ३४ हजार ०८६ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ४४ हजार ६६९ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार ०८६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४४ हजार ६६९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ३ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ७४६, चांदवड १ हजार ६३२, सिन्नर १ हजार ७०४, दिंडोरी १ हजार ३९२, निफाड ३ हजार ३२, देवळा १ हजार १७९, नांदगांव ७८७, येवला ७३७, त्र्यंबकेश्वर ५०२, सुरगाणा ३४७, पेठ २०८, कळवण ७५८, बागलाण १ हजार ४२३, इगतपुरी ५०६, मालेगांव ग्रामीण ८५३ असे एकूण १६ हजार ८०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २५ हजार ८६५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८५२ तर जिल्ह्याबाहेरील १४६ असे एकूण ४४ हजार ६६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ८१ हजार ८७७ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.२२ टक्के, नाशिक शहरात ८४.०१ टक्के, मालेगाव मध्ये ८०.३५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.६७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.०५ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ३६७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४२८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३३ व जिल्हा बाहेरील ९४ अशा एकूण ३ हजार १२२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– २ लाख ८१ हजार ८७७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ३४ हजार ०८६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४४ हजार ६६९ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.०५ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)