.
कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक -जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ५३० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७० ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ९६, बागलाण ५७, चांदवड ५७, देवळा ३४, दिंडोरी ७५, इगतपुरी १०, कळवण ०८, मालेगाव ४५, नांदगाव ३०, निफाड ८५, पेठ ०५, सिन्नर १०८, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ११, येवला ७४ असे एकूण ६९६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६५८ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५६ तर जिल्ह्याबाहेरील १३ रुग्ण असून असे एकूण १ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ५३० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.८६ टक्के, नाशिक शहरात ९७.९९ टक्के, मालेगाव मध्ये ९६.७२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार ६७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९३२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ४८२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– ४ लाख १ हजार ४३५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ९१ हजार ५३० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ४२३ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. ५३ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)