कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख २२ हजार ३६८ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक –जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ३६८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ५५२, चांदवड १ हजार ४८६, सिन्नर १ हजार ४९२, दिंडोरी १ हजार ११८, निफाड २ हजार ९०७, देवळा १ हजार ३३, नांदगांव ८३०, येवला ५९१, त्र्यंबकेश्वर ३५०, सुरगाणा ३०६, पेठ १४३, कळवण ५८३, बागलाण १ हजार ३६०, इगतपुरी ४३३, मालेगांव ग्रामीण ७६७ असे एकूण १४ हजार ९५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ४२४ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९१८ तर जिल्ह्याबाहेरील १७४ असे एकूण ३८ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६३ हजार ७७० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.५० टक्के, नाशिक शहरात ८५.७९ टक्के, मालेगाव मध्ये ७९.१६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.६७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.३० इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार २५९ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३५७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२९ व जिल्हा बाहेरील ९० अशा एकूण २ हजार ९३५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– २ लाख ६३ हजार ७७० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख २२ हजार ३६८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३८ हजार ४६७ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८४.३० टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)