नवी दिल्ली – कोरोना महामारीच्या दुस-या लाटेत जवळपास सर्व देशांमध्ये पहिल्यापेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. आशियामधील देशांमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसत आहे. भारतासह, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंकेसह इतर देशांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. भारता शेजारील देशांमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे ते जाणून घेऊ या.
पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये कोरोनाचे आतापर्यंत एकूण ९,०३,५९९ रुग्ण आढळले आहेत. ८,२०,३७४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २०,३०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा वाढला आहे. कोरोना संसर्गाच्या यादीत पाकिस्तान जगात २९ व्या स्थानावर आहे.
चीन
चीनमध्ये कोरोनाचे एकूण १,०७,१९५ रुग्ण आढळले आहेत. ४,८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, चीनमध्ये लशीचे एकूण ३८८,३१३,६०३ डोस देण्यात आले आहेत.
नेपाळ
नेपाळमध्ये कोरोनाचे एकूण ५,२०,४६१ रुग्ण आढळले आहेत. या छोट्या देशात कोरोनामुळे एकूण ६५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणा-या रुग्णांची संख्या ३,९८,४८३ इतकी झाली आहे. देशात सध्या १,१५,४४७ सक्रिय रुग्ण आहेत.
भूतान
भूतान कोरोनारुग्णांच्या यादीत १९२ व्या स्थानावर आहे. भूतानमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४११ आहे. महामारीमुळे फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ११८६ रुग्ण बरे झाले आहेत. येथे फक्त २२४ सक्रिय रुग्ण आहेत. १५ मेपर्यंत कोरोना लशीचे एकूण ४,८२,०३८ डोस देण्यात आले आहे.
श्रीलंका
श्रीलंकेत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,६७,१७२ असून, महामारीमुळे १२४३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. १,३९,९४७ रुग्ण बरे झाले आहेत. तर २५,९८२ सक्रिय रुग्ण आहेत. १६ मेपर्यंत श्रीलंकेत १,६५९,६५६ कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.
म्यानमार
म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ताबदल झाल्यानंतरची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. येथे माध्यमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लष्कर शासन कोरोनाचे खरे आकडे समोर आणू देत नाहीये. तरीही वर्ल्डओमीटरच्या आकडेवारीनुसार, येथे एकूण १,४३,२६२ कोरोनारुग्ण आढळले आहेत. त्यात ३२१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १,३२,२१८ रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्ण ७८२८ इतके आहेत. १२ मेपर्यंत एकूण २,९९४,९०० कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.
मालदीव
मालदीवमध्ये एकूण ५७३४१ रुग्ण आढळले असून, १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय ३३,१३६ रुग्ण बरे झालेले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या २४०६६ इतकी आहे. त्यापैकी ९० रुग्ण गंभीर आहेत. १६ मेपर्यंत येथे ४५१,४०१ लशीचे डोस देण्यात आले आहेत.
बांगलादेश
बांगलादेशात कोरोना रुग्णसंख्या ७८०५२१ वर पोहोचली आहे. त्यापैकी १२४०१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्याशिवाय ७३१५३१ रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ४६,५८९ इतकी आहे. ११२९ रुग्ण गंभीर झाले आहेत. येथे १७ मेपर्यंत कोरोना लशीचे ९,६४१,३१२ डोस देण्यात आले आहेत.