न्यूयॉर्क – कोरोना संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांमध्ये बाळाच्या जन्मादरम्यान मृत्यूची शक्यता वीस पटीने वाढते. वॉशिंग्टन, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील २१०० गर्भवती महिलांवर केलेल्या संशोधनात असा निष्कर्ष आला आहे. अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील एकूण ४३ महिला प्रसूती रुग्णालयांमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे.
सदर सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या संशोधनात दोन गटांमध्ये तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. एका गटातील गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती, तर दुसर्या गटाच्या महिलांमध्ये अशा प्रकारचे संक्रमण नव्हते. माता झालेल्या ११.५ टक्के अर्भकांनाही संसर्ग होता. ज्या गर्भवती महिलांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह होता, त्यांना सर्वात जास्त धोका होता.
यूडब्ल्यू स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ विभागाचे प्राध्यापक मायकेल ग्रेव्हॅट म्हणाले की, गर्भवती महिलांना कोरोना संसर्ग झाल्यास अन्य आजार होण्याची शक्यता असते. तसेच अमेरिकेतील येल विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक शेली फरहादियान म्हणतात की, आई आणि बाळाची नाळ यामध्ये संसर्गाविरूद्ध तीव्र प्रतिकारशक्ती आहे. विशेष म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करावा लागत आहे, तेव्हा हा अभ्यास झाला आहे.