नांदेड – कोरोनाचा परिणाम शारिरीकच नव्हे तर मानसिकरित्यासुद्धा होत आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे. हृदय पिळवटून टाकणारी अशीच एक घटना नांदेडमध्ये घडली आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे.
कोरोनामुळे लोक इतके भयभीत झाले आहेत की, ते मृत्यूला कवटाळत आहेत. देशभरातील कोरोना परिस्थितीl महाराष्ट्रात सर्वात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात एक कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झाले आहे. हनुमंत शंकर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चाटचा व्यवसाय करत होते. परंतु कोरोनाची लागण झाल्यानंतर ते गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूचा शोक अनावर झाल्यामुळे पत्नीने तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी मारून जीवनयात्रा संपवली. हनुमंत यांना दोन मुले आणि एक मुलगी होती. पतीनंतर आपला उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेतून पत्नीने मुलासह आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
भुकेने व्याकूळ झालेल्या अशा लोकांची संख्या ५०० असून, त्यांच्याकडे रेशनकार्ड आणि इतर सरकारी प्रमाणपत्र नसल्याने ते सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीयेत.