इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या करोनारुपी महामारीच्या तडाख्यातून अद्याप अनेक देश सावरलेले नाहीत. अजुनही करोना आणि करोनाप्रतिबंधक लस तसेच औषधोपचाराचे गंभीर परिणाम मनुष्य अनुभवत आहे. या पार्श्वभूमीवर करोन होऊन गेलेले तसेच करोनावरील लस घेणाऱ्यांना हार्टअटॅक आणि मधुमेहाचा धोका सर्वाधिक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माजी मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.
देशात गेल्या २४ तासात करोनाचे १६९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या २,२५७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (२८ फेब्रुवारी) रोजी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात करोना विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या ५,३०,७७१ वर पोहोचली आहे. ही सर्व स्थिती पाहता शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेला इशारा सर्वांचीच चिंता वाढविणारा आहे. स्वामीनाथन यांच्या मते,‘कोविड-१९ चा मानवाच्या श्वसनसंस्थेवर घातक परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका, मधुमेहाचा धोका वाढतो. करोनानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लस घेतल्यानंतरच्या तुलनेत ४ ते ५ टक्के जास्त असतो.’
फुफ्फुस, हृदयाला धोका
कोविड-१९ व्हायरस शरीरातील कोणत्याही अवयवावर तसेय यंत्रणेवर परिणाम करू शकतो. त्यातल्या त्यात फुफ्फुस आणि हृदयावर याचा परिणाम होतो. व्हायरल इन्फेक्शनमुळे संपूर्ण हृदयावर जळजळ होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. याला मायोकार्डिटिस म्हणतात, असे नवी दिल्ली येथील नॅशनल हार्ट इन्स्टिट्युटचे व्हिजिटिंग कन्सल्टंट डॉ. बिक्रम केशरी मोहंती यांचे म्हणणे आहे.
Corona Health Effect Heart Attack Diabetes