नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. दिल्ली, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाच्या एकूण तीन लाटा देशामध्ये येऊन गेल्या आहेत. यातील दोन लाटा तीव्र स्वरुपाच्या होत्या. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता थोपवण्यात यश आले आहे. असे असतानाही आता कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या या प्रादुर्भावाला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या बुधवारी (२७ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच, आरोग्य, आपत्तीसह अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
https://twitter.com/ANI/status/1518227693409796096?s=20&t=kQllp_YNma5cDpIUShzqTw