विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतात एकीकडे कोरोनाची साथ सुरू असताना दुसरीकडे वेगवेगळ्या अफवांची सुद्धा साथ सुरू आहे की काय? असे वारंवार दिसून येत आहे. कारण वारंवार अफवांना ऊत आला आहे. कोरोना विषाणूनेच नव्हे तर लशीसंदर्भात देशात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्र सरकारने लोकांसमोर सत्य ठेवले पाहिजे, असे तज्ज्ञांही वाटते. यावेळी देखील व्हाट्सएपवर एक संदेश व्हायरल होत आहे. त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार ‘कोरोना केअर फंड योजना’ अंतर्गत प्रत्येकाला ४ हजार रुपयांची मदत देत आहे. तर दाव्याचे सत्य काय आहे जाणून घेऊ या…
व्हॉट्सअॅपवरून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे की भारत सरकार ‘कोरोना केअर फंड योजना’ अंतर्गत फॉर्म भरल्यास तुम्हाला चार हजार रुपये मिळतील असा दावाही केला जात आहे. हा व्हायरल संदेश हिंदीमध्ये आहे. मात्र, जेव्हा या व्हायरल मेसेजची चौकशी केली गेली तेव्हा आणखी काही सत्य समोर आले. मात्र प्रेस इन्फर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबीच्या तथ्य तपासणी पथकाने हा दावा खोटा ठरविला आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले की, हा दावा खोटा आहे. कारण अशी कोणतीही योजना भारत सरकार चालवित नाही. विशेष म्हणजे बनावट मॅसेज हा सत्य असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न म्हणून या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही एक छायाचित्र आहे. तथापि, भारत सरकारची अशी कोणतीही योजना नाही.
हे बनावट मॅसेज तथा ट्विट अशा वेळी आले आहे की, जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २ जुलै रोजी कोविडग्रस्तांसाठी १.१ लाख कोटी कर्ज हमी योजना आणि आपत्कालीन क्रेडिट लाईनची हमी यासह आठ नवीन योजनांची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा समावेश आहे.