जिन्हेवा – ‘म्यू’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केली आहे. हा व्हेरिएंट अनेक म्युटेशन मिळून तयार झाला असून, त्यावर लशीचा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. हा व्हेरिएंट जानेवारी २०२१ मध्ये प्रथमच कोलंबियामध्ये आढळला होता. त्याचे बी.१६२१ असे वैज्ञानिक नाव आहे. डब्ल्यूएचओचे त्याच्यावर लक्ष आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने महामारीवरील साप्ताहित बुलेटिनमध्ये ‘म्यू’ला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्टच्या रूपात वर्गीकरण केले आहे. अनेक म्युटेशन मिळून हा व्हेरिएंट तयार झाला आहे. लशीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारक शक्तीला हा व्हेरिएंट मात देऊ शकतो. म्हणजेच दोन लशींचा डोस घेतला तरी कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. हा व्हेरिएंट आपले रूप बदलत आहे. त्याला योग्यरित्या समजण्याठी अभ्यासाची गरज आहे.
बुलेटिनुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘म्यू’ व्हेरिएंटच्या जागतिक व्यापकतेत घट झाली आहे. सध्या तो ०.१ टक्क्यांहून कमी आहे. म्हणजेच जागतिक पातळीवर या व्हेरिएंटचा प्रसाराचा वेग अधिक नाहीये. कोलंबिया (३९ टक्के), इक्वाडोर (१३ टक्के) मध्ये याचा प्रसार वाढत आहे. इतर देशात खूपच कमी प्रकरणे आढळत आहे. युरोपा आणि दक्षिण अमेरिका आणि हाँगकाँगमध्ये ‘म्यू’चे रुग्ण आढळले आहेत.
जगभरात चिंताजनक असणारा ‘म्यू’ व्हेरिएंट आतापर्यंत भारतात आढळलेला नाहीय. त्याशिवाय आणखी एक सी. १. २. या म्युटेशनचा एकही रुग्ण कोणत्याच देशात आढळेला नाही. भारतात कोरोनाचे २३२ हून अधिक म्युटेशन आढळले आहेत. नवी दिल्लीतील आयजीआयबीचे डॉ. विनोद स्कारिया सांगतात, म्यू (१.६२१ आणि बी. १.६२.१) च्या एकाही रुग्णाची अद्याप नोंद झालेली नाही. इंग्लंडच्या आरोग्य यंत्रणेने म्यू व्हेरिएंटला गंभीर संबोधले आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार या व्हेरिएंटमध्ये अनुवांशिक परिवर्तन होते. सामुदायिक प्रसाराची क्षमता असल्यामुळे हा व्हेरिएंटसुद्धा धोरादायक आणि आक्रमक आहे.