नाशिक – शहरात व परिसरात कोरोना कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास सहाय्य प्रदान केले जाणार आहे. शासन निर्देशांनुसार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सहा ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
शासन निर्देशांनुसार कोरोना कोविड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचा नातेवाईकास र.रु.(50,000/-) अक्षरी र.रु. पन्नास हजार रुपये सानुग्रह सहाय्यक राज्य आपत्ती मदत निधी मधून प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या शासन आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सहा विभागांमध्ये सहा नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या माध्यमातून शासन निर्देशाप्रमाणे अर्ज सादर करून घेणे या प्रकरणांची तपासणी करणे बाबत गती देण्याच्या सूचना खातेप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
ज्या व्यक्तींचे कोरोना कोविड-19 या आजारामुळे निधन झाले आहे त्याच्या नातेवाईकांनी निश्चित केलेल्या सहा ठिकाणी जाऊन या योजनेबाबतची विस्तृत माहिती घेऊन अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करताना अर्जदाराने अर्जदाराचा स्वतःचा तपशील,आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक,अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र इतर नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत दाखल करणे बंधनकारक असणार आहे. तरी कोरोना कोविड-19 या आजारामुळे निधन झाले आहे, त्याच्या नातेवाईकांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावे, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
तसेच ज्या पाल्यांचे एक किंवा दोन्ही पालकांचा कोरोना कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे.त्या पाल्यांना प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याची माहिती मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील खालीलप्रमाणे सहा विभागात अर्ज स्विकारण्याची व त्याबाबतची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपा विभागीय नोडल अधिकारी – विभाग- दुरध्वनी क्रमांक
डॉ. विजय कुमार देवकर -पंचवटी विभाग-2532512023
डॉ. जितेंद्र धनेश्वर – नाशिकरोड विभाग- 2532461377
डॉ. योगेश कोशिरे – सातपुर विभाग- 2532350598
डॉ. नविन बाजी – सिडको विभाग – 2532393425
डॉ. चारुदत्त जगताप – पश्चिम विभाग- 2532570493
डॉ. विनोद पावसकर – नाशिक पुर्व विभाग – 2532945295
वर नमूद ठिकाणी सकाळी 10.00 वा. ते सायंकाळी 05.00 वा. यावेळेत संपर्क करून कोरोना कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.