विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
जगभरात अनेक देशात अद्यापही करोनाचा संसर्ग कायम असून काही देशांमध्ये तो कमी होतांना दिसून येत असून अनेक देशांमध्ये मात्र वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट राहिलेले भारत व आफ्रिकेतील देश कोरोनाच्या संथ अवस्थेत आहे. तर अमेरिका, श्रीलंका, न्यूझीलंड इत्यादी देशांना अजूनही संसर्गाच्या वाढीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये ही जगातील सर्वाधिक संसर्ग असलेल्या सुमारे १३ देशांपैकी १० गरीब देश असे आहेत की, जिथे सध्या साथीच्या रोगाने खूपच कहर केला आहे.
सध्याच्या काळात जगातील कोणताही देश कोरोना संसर्गामुळे दूर राहिलेला नाही. त्यातच जगातील १३ देशांमध्ये कोरोना संसर्ग अत्यंतच्या शिखरावर आहे, त्यापैकी ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, फिलिपिन्स वगळता इतर सर्व १० देश हे अर्थव्यवस्था आणि वैद्यकीय संसाधनाच्या बाबतीत खूप कमकुवत आहेत. यात न्यू कॅटालोनिया, सुरीनाम, अँटिगुआ आणि बाबुडा, गयाना, सेंट किट्स अँड नेविस, जोमैका, मंगोलिया, मॉरिशस, पॅलेस्टाईन, सेंट लुसिया यांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोरोना संसर्ग पातळी एकतर १०० टक्के आहे किंवा संसर्ग शिखर पातळीच्या अंशतः खाली आहे.
दरम्यान, अलीकडेच जगभरात नोंदवलेल्या प्रत्येक शंभर नव्याने संक्रमित झालेल्या रुग्णांपैकी २८ रुग्ण हे आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये संक्रमणासह असुरक्षित असल्याचे आढळले. या देशात दर ५ दिवसांनी १० लाख नवीन रुग्ण येत आहेत, तर ५३ देशांमध्ये वाढता संसर्ग चिंताजनक आहे. तसेच युरोपमध्ये २४ देशात संसर्ग वाढू लागला आहे, यात आशिया आणि मध्य पूर्वमधील ६ देश, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनमधील १२ देश, आफ्रिकेतील ७, ओशिनिया प्रदेश आणि दक्षिण अमेरिकेत प्रत्येकी २ देश यांचा समावेश आहे.