मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पतसंस्थांच्या निवडणुकसंबंधित एक मोठा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. जर एखाद्या व्यक्तीला सहकारी पतसंस्थेचे संचालक व्हायची इच्छा असेल तर त्याला पतसंस्थेमध्ये ठराविक रक्कम मुदत ठेव म्हणून म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवावी लागणार आहे. अनेकजण हे पतसंस्थेचे फक्त नाममात्र सदस्य असतात. पतसंस्थेच्या कामकाजाशी काहीही संबंध नसतानाही ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. अशा सर्व उमेदवारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, संबंधित संस्थेत फिक्स्ड डिपॉझिट असेल तरच निवडणूक लढवता येणार आहे.
सहकार आयुक्तांनी याविषयी आदेश जारी केला आहे. अनेकजण पतसंस्थेमध्ये कोणतीही ठेव ठेवत नाहीत. फक्त निवडणूक आली की उमेदवार म्हणून समोर येतात. केवळ स्वतःचा स्वार्थ यातून त्यांच्याकडून पाहिला जातो. अशा सर्वांना या नियमामुळे चाप बसणार आहे. निवडणूक लढवायची असेल तर उमेदवाराला पतसंस्थेत ठराविक रक्कम मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) ठेवावीच लागेल. त्यानंतरच त्याला निवडणूक लढवता येईल. या आदेशानुसार राज्यातील सर्व पतसंस्थांनी आपल्या उपविधीमध्ये दुरुस्ती करावी असे सहकार आयुक्तांनी सांगितले आहे.
काही उमेदवार निवडणुकीत उभे राहण्यासाठी चतुराईदेखील करायचे. निवडणुकीला उभे राहण्यापुरते पतसंस्थेतील बचत खात्यामुळे ठराविक रक्कम ठेवून तीच मुदत ठेव असल्याचे दाखवत असत. त्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारल्यानंतर ही रक्कम उमेदवार परत काढून घेतली जाते. या सगळ्याची गंभीर दखल सहकार खात्याने घेतली आहे. म्हणूनच प्रत्येक उमेदवाराला फिक्स डिपॉझिट ठेवावे लागणार आहे.
Cooperative Department Department Patasanstha Election Compulsion Cooperative Credit Society