अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील पदांची नोकरभरती प्रकिया राबविणेसाठी उपनिबंधक (नागरी बँका) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडून एजन्सीज् ची नामतालिका (पॅनेल) तयार करणे व नामतालिकेवर समावेश होणेसाठी पात्र नागरी सहकारी फेडरेशनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत असावी. सदर संस्थेस किमान 10 वर्षे पूर्ण झालेली असावीत. किमान 25 सहकारी बँका सदर संस्थेच्या सभासद असाव्यात. सदर संस्थेचा ऑडीट वर्ग मागील सलग 3 वर्षे ‘अ’ असावा व सदर संस्था मागील सलग 3 वर्षात नफयात असावी. नामतालिकेवर समाविष्ट होणाऱ्या एजन्सीसाठी अधिकची पात्रता व लागू अटी शतीसाठी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क करावा.
वरीलप्रमाणे नामतालिकेवर (पॅनेलवर) समावेश होणेसाठी संबंधित संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, नविन मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे-४११००१ यांचे नांवे करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल, 2022 आहे. प्राप्त अर्जांची छाननी 5 मे, 2022 रोजी पूर्ण करून अंतिम नामिका 11 मे, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे, उपनिबंधक (नागरी बँका) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.









