मुंबई – अनेक कंपन्या आपल्या उत्पादनाच्या विविध प्रकारे जाहिराती करताना खूप कल्पकता आणि सर्जनशीलता दाखवतात. परंतु कधीकधी ही आयडिया अंगलट येते. त्यांना माफी देखील मागावी लागते. असाच एक प्रकार दक्षिण कोरियातील एका डेअरी कंपनीसोबत घडला आहे.
या दूध कंपनीने असे काही दाखवले की, त्यामुळे नागरिक चांगलेच संतापले. कारण या कंपनीने आपल्या जाहिरातींमध्ये गायींऐवजी चक्क महिला दाखवल्या. मात्र अखेर प्रकरण इतके वाढले की या कंपनीला माफी मागावी लागली.
एका रिपोर्टनुसार, ही जाहिरात दक्षिण कोरियाची डेअरी कंपनी सियोल मिल्कने केली आहे. कॅमेरा असलेला एक माणूस जंगलात, हवेत शूटिंग करत असून तो काही महिलांचे गुपचूप व्हिडिओ बनवत असल्याचे या जाहिरातीत दिसत आहे. या महिला कधी पाण्याजवळ तर कधी जंगलात दिसतात. मग अचानक या स्त्रिया या माणसाला पाहताच त्या सर्व आपोआप गायी बनतात.
बघा हा व्हिडिओ
सोल मिल्कने या जाहिरातीला एक कॅप्शन देखील दिले आहे. यामध्ये लिहिले आहे, ‘स्वच्छ पाणी, सेंद्रिय खाद्य आणि 100 टक्के शुद्ध सोल दूध ‘. आणि ‘ चोंगजांगच्या आल्हाददायक निसर्गातील सेंद्रिय शेतातील सेंद्रिय दूध.’ परंतु यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. कारण या कंपनीवर त्यांच्या जाहिरातीत महिलांची तुलना गायीशी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अखेर या गदारोळानंतर कंपनीने ही जाहिरात काढून टाकण्यात आली आहे. एका निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, ‘ज्यांना आमची जाहिरात पाहून अस्वस्थ वाटले त्या सर्वांची माफी मागतो. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत आणि भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी अधिक काळजीपूर्वक पावले उचलू.’ असेही यात म्हटले आहे.