नाशिक – नाद खुळा म्युझिक प्रस्तुत (प्रशांत नक्ती निखील नमित) संजू राठोड आणि सोनाली सोनवणे स्वरबद्ध केलेलं हे गीत निल चव्हाण व श्रद्धा पवार या नवोदित कलाकारांना घेऊन दिग्दर्शक अभिजित दाणी यांनी येड्यावानी करतय हे गीत प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडत आहे
“डिंपल “या गाण्याचा गीतकार संजू राठोड संगीतकार जी स्पार्क व दिग्दर्शक अभिजीत दाणी यांनी गावरान गीत बनवायचे ठरविले त्यांची टीम लगेच कामाला लागली कोरेगाव या इगतपुरी तालुक्यातील गावात गाण्याचे चित्रीकरण करण्याचे ठरवले चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि दुपारनंतर जोराचा पाऊस सुरुवात झाला दोन दिवस मागे न हटता चित्रीकरण सतत 36 तासात काम करून पूर्ण केले.
गीताचा दिग्दर्शक अभिजीत दाणी सांगतो की सर्वांकडून काम करून घेणं सोपं होतं परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे काम करून घेण खूप मुश्कील झालं होतं मेकअप करून पुन्हा पावसात उभ राहण आणि थोडा पाऊस आला की पुन्हा आडोशाला जाऊन राहण ह्या गोष्टी खुप अवघड होत्या त्यात कॅमेरा बाकीच्या गोष्टी लाईट सर्व सेटअप करून घेणं त्रासदायक होत ,तरी सर्व मॅनेज करून टीमने उत्साहाने काम केलं आणि जेवण असून सुद्धा पावसामुळे सर्वांना काम करावं लागलं याचा खेद वाटतो तरी याच अवस्थेत टिमच्या सहकार्यामुळेच 36 तास आम्ही हे काम पुर्ण करू शकलो अविस्मरणीय गीत पूर्ण होण्यासाठी वाटचाल करु शकलो.
या गीताचा गायक संजू राठोड सांगतो की या अगोदर मी नेहमी मॉर्डन पद्धतीने गाणं बनवत होतो परंतु मला गावरान पद्धतीने एक गाणे बनवायचे होते मग मी माझ्या टीमशी बोललो त्यानंतर आम्ही लोकेशन ला गेलो . याठिकाणी आम्ही चित्रीकरण करण्याचे ठरविले परंतु चित्र करना च्या दरम्यान इतक्या अडचणी आल्या त्या अडचणी मी शब्दात सांगू शकत नाही परंतु ज्या वेळेस शूटिंग नंतर प्रत्यक्ष मी गाण्याचा व्हिडिओ बघितला त्यावेळेस मला हे अपेक्षितच नव्हते कि इतके सुंदर हे गीत होईल. यात फिमेल पॅच नव्हता परंतु , प्रशांत दादा व टीमने ठरवल्यानंतर आम्ही हे गीत सोनाली सोनावणे कडून गाऊन घेण्याच ठरवलं.
या गीताचे एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसर अभिषेक क्षत्रिय , प्रियंका दाणी व बबन नागरे सांगतात की काम करत असताना या सेटवर सर्व गोष्टी मॅनेज करणं आलेल्या कलाकारांची व्यवस्था करणं साहित्याची जमवाजमव करणं हे खूप अवघड होतं त्यातल्यात्यात पाऊस सतत चालू असल्यामुळे त्या वस्तू खराब होतील याची काळजी घेणे खूप जिकिरीचं काम होतं पावसात रेलचेल करत मार्गक्रमण करत या सेटवर पोहोचलो खूप अवघड काम होतं आणि सर्व कलाकारांना सेटवर व्यवस्थित पोहोचवून तिथून परत त्यांना सुरक्षित स्थळी आणणं हे खूप अवघड असून सुद्धा सर्व टीमने चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं सर्वांचा उत्साह खूप होता आणि म्हणूनच हे सर्व पार पाडू शकलो आणि म्हणतात ना की मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नसतो आणि त्याच्या नंतरच यश मिळतं तेच खूप मोठं असतं म्हणूनच हे गीत आहे हे मोठे यशापर्यंत नक्कीच पोहोचेल असा सर्वांना विश्वास आहे.
आर्ट डिरेक्टर प्रतीक विसपुते म्हणतो, की सर्व सेट बॅकग्राऊंड तयार करताना खूप आनंदाने आणि उत्साहाने तयार केला परंतु पावसाने त्यावर पांघरूण घातले आमचा उत्साह मावळला होता पाऊस सतत व्यत्यय आणत होता आणि सततच्या पावसात आम्ही पुन्हा पुन्हा सेट उभा करत होतो तरीही पाऊस थांबत नव्हता आम्ही ठरवलं होतं . पाऊस थांबला नाही तरीही आपण थांबायच नाही अशातच आमचं शूट सतत अविरतपणे 36 तास काम करून पूर्ण केलं दिग्दर्शक कलाकार सर्व टीम अतिशय जोमाने आणि उत्साहाने काम करतात हे बघून सर्वच लोक काम करत होते म्हणून सर्वांचाच उत्साह यामुळे आम्ही काम करू शकलो आणि म्हणूनच हे गाणं इतकं सुंदर झालं. प्रोडक्शन मॅनेजर संदेश ताठे, दर्शन राठोड व प्रितेश पाटील तसेच मेकअप आर्टिस्ट आदित्य पवार यांनीही खूप मोलाचे सहकार्य दिले.