इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, अत्यंत गैरसोयीच्या ठिकाणी असो की आणखी कोठेही ! मद्य विक्रीची दुकाने ही अत्यंत गर्दीने ओसंडून वाहत असतात. इतकेच नव्हे तर या ठिकाणी येणारे ग्राहक मद्याची बाटली खरेदी करताना त्यावर किती किंमत आहे ? याचाही विचार न करताच पैसे देऊन गुपचूप पसार होतात. त्यामुळे मद्यविक्रेत्यांचा चांगलाच फायदा होतो, किंबहुना हे विक्रेते ग्राहकांची सरास लूट करतात असे दिसून येते.
परंतु एका जागरूक ग्राहकाने मद्यविक्रेत्याविरुद्ध तक्रार केल्याने त्या विक्रेत्याला चांगलाच भुर्दंड बसला इतकेच नव्हे तर विदेशी दारूच्या बाटलीवर दर्शनी किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारल्याच्या प्रकरणावर सुनावणी घेत ग्राहक आयोगाने विक्रेत्याला तक्रारदाराला २५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
फिर्यादी अमित कुमार (रा. रोशनाबाद कचारी, हरिद्वार) यांनी धनौरी येथील विदेशी मद्य परवानाधारक दुकानदार अशोक कुमार, (रा. हिरा हेडी, इकबालपूर) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने आरोप केला होता की, त्याने डेबिट कार्डने त्या मद्य दुकानातून विदेशी दारूची बाटली खरेदी केली होती. मात्र डेबिट कार्डमधून 790 रुपये काढले गेले होते, खरे तर बाटलीवर 780 रुपयांची किंमत होती.
तक्रारदाराने दहा रुपये अधिक घेण्याचे कारण विचारल्यावर दुकानदाराकडून शिवीगाळ करण्यात आली. तसेच 10 रुपये जास्त घेतले माझे कोणी काही बिघडवू शकत नाहीत, असा दमही देण्यात आला होता. ग्राहक आयोगात विरोधकांविरोधात दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी करताना आयोगाचे अध्यक्ष कंवर सेन सदस्य अंजना चढ्ढा आणि विपिन कुमार यांनी वरील निर्णय दिला आहे.
Consumer Forum order 25 lakh fine shopkeeper