मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड महामारीची वाढती जोखीम आणि वाढत्या मागणीमुळे विमा कंपन्या टर्म इंशुरन्सचा प्रीमियम सातत्याने वाढवत आहे. डिसेंबरच्या तिमाहीत टर्म इंशुरन्सचा प्रीमियम ४.१८ टक्के वाढला आहे. पहिली तिमाही ते चौथ्या तिमाहीपर्यंत किंमतीत ९.७५ टक्क्यांची मोठी वाढ करण्यात आली आहे.
ऑनलाइन विमा एग्रिगेटर पॉलिसी एक्स.डॉमने एका वृत्तात दावा केला की, मूल्याच्या हिशेबानुसार २०२१ सालच्या पहिल्या तिमाही आणि चौथ्या तिमाहीदरम्यान प्रीमियम ९.७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. पोर्टलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवल गोयल सांगतात, महामारीच्या जोखीम पाहता टर्म इंशुरन्सची मागणी सातत्याने वाढत आहे.
तसेच पॉलिसीच्या क्लेममध्येही वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या मिळकतीवर होत आहे. त्याची भरपाई भरून काढण्यासाठी विमा कंपन्या विम्याच्या किमती वाढवत आहेत. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये टर्म इंशुरन्स प्रीमियम ४.१८ टक्के वाढून २३,९२९ रुपये प्रतिवर्ष झाला आहे. पाच प्रमुख विमा कंपन्यांपैकी तीन कंपन्यांनी डिसेंबर तिमाहीमध्ये ०.९ टक्क्यांवरून १३.४ टक्क्यांपर्यंत किमती वाढविल्या आहेत. दोन कंपन्यांनी प्रीमियम स्थिर ठेवला आहे.
वाढत्या वयानुसार टर्म इंशुरन्स प्रीमियम जितक्या लवकर खरेदी कराल, तितकाच स्वस्त मिळणार आहे. जर कोणी २५ वर्षांचा ग्राहक टर्म इंशुरन्स खरेदीसाठी दहा वर्षांचा उशीर करत असेल तर त्याला ४८.९ टक्के अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे ३५ वर्षांच्या व्यक्तीने उशिराने विमा खरेदी केला तर ७७.६ टक्के आणि ४५ वर्षांच्या ग्राहकाने उशिराने विमा खरेदी केला तर ८०.८ टक्के अधिक रक्कम द्यावी लागते. त्यामुळे टर्म इंशुरन्सचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर विमा खरेदी करणे योग्य ठरेल.
यांना विमा महागात
वृत्तात दावा केला आहे की, धुम्रमान करणे विमा कंपन्या आरोग्याबाबत मोठी जोखीम मानतात. सिगरेट पिणार्या ग्राहकांहून अधिक प्रीमियम वसूल करतात. समान वयाच्या सिगरेट पिणार्या व्यक्तीला टर्म इन्शुरन्सवर ५०.५ टक्के अधिकचा प्रीमियम द्यावा लागणार आहे. महिलांसाठी हाच प्रीमियम ४९.५ टक्के वाढणार आहे. याचाच अर्थ असा, की ग्राहकांच्या आरोग्याची जितकी मोठी जोखीम, त्याच प्रमाणात प्रीमियमची रक्कम वाढण्याची शक्यता अधिक. यामध्ये वय आणि लिंग यांची मोठी भूमिका असते.