नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध शासकीय योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळावा या साठी त्यांची नोंदणी आवश्यक असून या नोंदणीसाठी केडाई नाशिक मेट्रो तर्फे एक हेल्पलाईन ची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली .
बांधकाम कामगार हा बांधकाम उद्योगाचा एक अविभाज्य घटक असून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केडाई नाशिक मेट्रो तर्फे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते . या सप्ताहाचा काल समारोप करण्यात आला . त्या प्रसंगी ते बोलत होते. या सप्ताहात कामगार नोंदणी , कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन या चे विविध उपक्रम राबविण्यात आले.
बांधकाम कामगारांसाठी फक्त सप्ताह नाही तर रोजच कामे चालू राहतील. नोंदणीसाठी हेल्पलाइन नंबर नासिक मेट्रो तर्फे देण्यात आला असून त्यात त्या नंबर वर संपर्क केल्यास आपणास बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल असेही अध्यक्ष कृणाल पाटील यांनी सांगितले
या सप्ताहात काय काय उपक्रम राबविले याची माहितीक्रेडाई नासिक मेट्रो चे सचिव गौरव ठक्कर यांनी दिली . ते म्हणाले कामगारांचे मेसन, बार बेंडर ,कारपेंटर ,या विविध ट्रेड मध्ये आर पी एल या प्रशिक्षणा अंतर्गत तीस जणांची बॅच असलेल्या बॅचेस सुरुवात झाली .तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या कामगारांना प्रमाणपत्र दिले गेले .मजूर नोंदणी चे फायदे कामगारांना समजावून सांगण्यात आले .क्रेडाई नासिक मेट्रो ने बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचे माहितीपत्रक वेगवेगळ्या साइटवर सुमारे १०००० कामगारांपर्यंत पोहोचविले .
या सोबतच महात्मा फुले योजना, जनधन योजना अशा विविध योजना तसेच इन्शुरन्स, मेडिक्लेम यासंबंधी सर्व कामगारांना माहिती दिली गेली . तसेच सर्व कामगारांची आरोग्य तपासणी , दंत तसेच नेत्र तपासणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या सहकार्याने एम व्ही पी, एसएमबीटी ,केबीएच तुलसीआय या हॉस्पिटल ने तपासणी केली . तसेच स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुषमा भुतडा यांनी बांधकाम कामगार महिलांची तपासणी केली . करून सर्व कामगारांना मोफत औषधे पुरवण्यात आली .
या सप्ताह अंतर्गत सामाजिक उपक्रमात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने बांधकाम कामगारांनाही रक्तदान केले. रक्तदान करण्यापूर्वी त्यांना आरोग्याचे महत्त्व तसेच तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले या उपक्रमांतर्गत आयएएस या संस्थेच्या सहकार्याने साइटवर हार्ट अटॅक आल्यास करावयाच्या प्राथमिक उपचारांबद्दल प्रतिकृती वर प्रत्यक्ष करून दाखविले.
या सप्ताहात झालेल्या मार्गदर्शनात क्रेडाई राष्ट्रीय चे घटना समिती चे प्रमुख जितूभाई ठक्कर यांनी कामगारांसाठी असलेल्या विविध प्रशिक्षणाची माहिती दिली तर माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी पंतप्रधान आवास योजना याची माहिती बांधकाम कामगारांना दिली तसेच कामगारांना हक्काचे घर मिळावे या साठी क्रेडाई नासिक मेट्रो शासनाकडे पाठपुरावा करून कामगारांना घरे कसे मिळवून देता येईल याची माहिती घेऊ असे सांगितले
क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल यांनी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री प्रमोद खैरनार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या विविध 66 शहरात हा सप्ताह अत्यंत यशस्वीरित्या राबविला गेला असल्याचे नमूद केले . सहसचिव नरेंद्र कुलकर्णी व सहसचिव अनिल आहेर यांनी सर्व कार्यक्रमांची नियोजन केले कमिटी सदस्य सतीश मोरे, विजय चव्हाणके ,ऋषिकेश कोते ,मनोज खिवसरा ,सचिन बागड ,अंजन भालोदिया ,अतुल शिंदे, सागर शहा ,सुशील बागड, हंसराज देशमुख व सर्व कमिटी सदस्य यांनी परिश्रम घेतले. या सप्ताहाच्या यशस्वी होण्यासाठी विविध शासकीय विभाग , अधिकारी , सामाजिक संस्था यांनी पण मोलाचे सहकार्य केले.
१.कामगार नोंदणी साठी हेल्पलाईन क्रमांक – 7887898901
२. एकूण 300 कामगारांचे प्रशिक्षण
३. 50 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन
4. 100 पुरुष व 25 महिला कामगारांची आरोग्य तपासणी
5. आगामी वर्षात 3000 कामगारांच्या नोंदणीचे लक्ष्य.
Construction Worker Registration Helpline Credai Nashik Initiative