मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घर तथा निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे, साहजिकच प्रत्येक जण आपल्या हक्काचे घर असावे असा जीवनात प्रयत्न करतो, परंतु घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची साहित्याच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये खूपच वाढल्याने घराचे स्वप्न अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नव्हते. परंतु आता थोडीशी परिस्थिती बदलली आहे. बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये काहीशी घट आल्याने आता अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
कोणीही घर बांधण्याचा काही विचार असेल तर सध्या चांगली संधी आहे. कारण बांधकामासाठी लागणारं साहित्य सध्या स्वस्त मिळत आहे. कमी मागणी, रिअल इस्टेट क्षेत्राची दुर्दशा आणि सरकारचा हस्तक्षेप यामुळे बांधकाम साहित्याच्या किमती गेल्या काही दिवसांत झपाट्याने खाली आल्या आहेत. कारण घर बांधकामसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर बरेच खाली उतरले आहेत. एप्रिल ते जून महिन्यात नवे नवे उच्चांक नोंदवणाऱ्या सिमेंट, स्टील आणि सळईच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
देशातील ज्या ज्या शहरात या साहित्याचे उत्पादन होते. तिथे सिमेंट, सळईने महागाईचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर सरकारने हस्तक्षेप केला. त्यानंतर जूनच्या मध्यानंतर किंमतीत घट आली. त्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने घर बांधण्याची प्रक्रिया मंदावली. ग्राहकांनी माल खरेदी न केल्याने किंमती आटोक्यात आल्या आहेत. आता घर बांधण्यासाठीच्या या साहित्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे अशात घर बांधायचा विचार करत असाल तर हा चांगला काळ म्हणता येईल.
विशेष म्हणजे सरकारने बांधकाम साहित्याच्या किंमती घटल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, टीएमटी सळईचा घाऊक भाव 65 हजार रुपये प्रति टन रुपयांच्या जवळपास पोहचला आहे. हा भाव एप्रिल महिन्यात 75 हजार रुपये प्रति टन इतका होता. तर सळईचे किरकोळ भाव 60 हजार रुपये प्रति टनाहूनही खाली उतरला आहे. एप्रिल महिन्यात हाच भाव 80 हजार रुपयांच्यावर पोहचला होता. तर ब्रँडेच सळईचा भाव एप्रिल महिन्यात एक लाख रुपये प्रति टनवर पोहचला होता. हा भाव आता 85 हजार रुपये प्रति टनाहूनही खाली घसरला आहे. यासोबतच सिमेंटच्या भावात ही घसरण दिसून आली.
एप्रिल महिन्यात 50 किलो सिमेंटची थैली 450 रुपयांच्यावर पोहचली होती. सध्या हा भाव 400 रुपयांहून ही घसरला आहे. विटांच्या किंमतीत ही घसरण दिसून येत आहे. घर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जसे टाईल्स, वाळू आणि राख यांच्या किंमतीत ही घसरण झाली आहे. घर तयार करण्यासाठी जे साहित्य वापरण्यात येत आहे. त्याच्या किंमतीत अचानक घट का झाली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
यावर्षी एप्रिल ते जून महिन्यात बांधकाम साहित्याचे दर गगनाला पोहचले होते. त्यामुळे घर बांधावे पाहून या मराठी म्हणीचा अनुभव अनेकांनी खऱ्याअर्थांनी घेतला होता. सध्या दर घसरले आहेत. ऑगस्ट महिना संपत आला असून सप्टेंबर महिन्याला महिना सुरू होण्याला काही दिवस बाकी आहेत. पावसाळ्यात आणि किमतींचे बांधकाम काहीसे थंडावलेले असते परंतु सणासुदीनंतर बांधकामाला वेग येण्याची शक्यता आहे, साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा घरबांधणीचा श्रीगणेशा होतो. त्याआधीच सरकारने भाव कमी होण्यासाठी उपाययोजना राबविल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी सरकारने स्टीलचे निर्यात शुल्क वाढवले होते. त्यावर एक्स्पोर्ट ड्युटी वाढवल्याने स्थानिक बाजारात स्टीलचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाला. त्यामुळे स्टीलचे भाव खाली आले. तर पावसाळ्यामुळे उठाव नसल्यानेही भाव घसरले आहेत. सध्या लोखंडी रॉडची किंमत विक्रमी पातळीपेक्षा खाली आहे, तर सिमेंट, विटा यांसारख्या बांधकाम साहित्याच्या किमतीही खाली आल्या आहेत. मोठया शहरात पहिल्या क्रमांकाच्या 1000 विटा 5000 रुपयांना मिळत आहेत. तसेच क्रमांक दोनच्या हजार विटांची किंमत 4 हजार रुपये आणि मऊ प्रकारच्या हजार विटांची किंमत 4 हजार 700 रुपये झाली आहे. दुसरीकडे ब्रिक्स 5,300 रुपये प्रति हजार युनिट आणि उच्च दर्जाच्या विटा 5,500 रुपये प्रति हजार युनिट दराने उपलब्ध आहेत. महिनाभरापूर्वी त्यांच्या किमती किमान 6000 रुपयांच्या वर होत्या.
Construction Material Cost Reduced Relief
Real Estate