नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत अखेर मोठा निर्णय झाला आहे. काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक आज येथे सुरू आहे. त्यास प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित आहेत. पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर निर्णय घेण्यात आला की, अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे पक्षाला नवा अध्यक्ष पुढील वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळणार आहे. याचाच अर्थ पुढील वर्षीच्या प्रारंभी देशातील पाच राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांनंतरच पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सोनिया गांधींकडेच अध्यक्षपदाची धुरा राहणार की राहुल गांधी अध्यक्ष होणार हे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू स्पष्ट होणार आहे.
अध्यक्षपद निवडणूक कार्यक्रम असा