पणजी – गोव्यातील काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सायंकाळी गोव्यात दाखल होणार आहे. हे आठ आमदार भाजमध्ये गेले तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात येणार आहे. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार असून त्यापैकी आठ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी एक दोन न फुटता आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. गोवा विधानसभेची सदस्यसंख्या ४० असून भाजपकडे २० तर काँग्रेसकडे ११ आमदार आहेत. याव्यतिरिक्त एमजीपीकडे दोन अपक्ष तीन आमदार आहे. काँग्रेसचे हे आमदार भाजमध्ये गेल्यास २० आमदारांची संख्या २८ जाणार आहे.