रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सोनिया गांधी पुन्हा परदेशात जाणार; राहुल आणि प्रियंकाही सोबत राहणार

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 1:05 pm
in राष्ट्रीय
0
rahul sonia priyanka

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  सध्या सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार असला तरी गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने फारशा सक्रिय नाहीत. परंतु राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमात दिसून येतात. आता वैद्यकीय उपचारासाठी सोनिया गांधी परदेशात जाणार असून त्यांची काळजी घेण्यासाठी राहुल व प्रियंका गांधी सुद्धा त्यांच्या सोबत राहणार आहेत. परंतु त्याआधी राहुल गांधी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीला संबोधित करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी आजारी होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून घेतली होती. आता ईडीने नवीन नोटीस बजावली आहे. दरम्यान, दि. 4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘महंगाई पर हल्ला बोल’ या रॅलीला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लवकरच वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार आहे. त्यांच्यासोबत प्रियंका आणि राहुल गांधीही यांचासही त्यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही माहिती दिली. मात्र, सोनिया गांधी परदेशात कधी जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात जाणार असून यावेळी त्या आपल्या आजारी आईचीही भेट घेणार आहेत. तेथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल आणि प्रियंका गांधीही काही काळ असणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत पक्षाने हेल्थ अपडेट दिले. कोविड संसर्गानंतर सोनियाजींच्या नाकातून रक्त येऊ लागले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या श्वसनमार्गाच्या खालच्या भागात संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी जात असतानाच काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि पक्षाध्यक्षपदाची निवडणुकीची तयारीही काँग्रेसकडून केली जात आहे.

दुसरीकडे काही दिवसापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षातील राजकीय मतभेदामुळे काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले होते, त्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. आनंद शर्मा यांची नाराजी दूर करण्यासाठी हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला यांना आनंद शर्मा यांच्याकडे पाठवण्यात आले होते, त्यांच्या भेटीनंतर शुक्ला यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला आले होते. सोनिया गांधी यांचे पक्षातील अंतर्गत मतभेद आणि हालचालीत कडे लक्ष आहेच, परंतु त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाची समजले जात आहे.

नुकतीच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या दोन्ही पदासाठी भाजपने उभे केलेले उमेदवार निवडून आले असून काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यानंतर सोनिया गांधी यांनी या संदर्भातील माहिती घेतल्याची समजते इतकेच नव्हे तर मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भेट घेऊन काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आहे.

Congress President Sonia Gandhi abroad travel
Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली रुग्णालयात भेट

Next Post

CNG कारचालकांसाठी मोदी सरकारने केली मोठी घोषणा

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

CNG कारचालकांसाठी मोदी सरकारने केली मोठी घोषणा

ताज्या बातम्या

Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011