नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या नव्या प्रमुखाची निवड ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होऊ शकते. ही निवडीची प्रकिया येत्या २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. वायनाडचे खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याठिकाणी अनेक दिवसांपासून गैर-गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरू होती, मात्र अद्याप यावर एकमत झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी मार्चमध्येच वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान राहुल आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासोबत राजीनामा देण्याची ऑफर दिली. २०१७ मध्ये राहुल यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. मात्र, तब्बल दोन वर्षांनी त्यांनी हे पद सोडले.
या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांचा एक मोठा वर्ग गांधींना कारभार पाहण्याची इच्छा व्यक्त करीत आहे. ते म्हणाले की, गटबाजीने ग्रासलेल्या पक्षावर गांधी घराण्याचा एकत्रित प्रभाव असल्याचे नेत्यांना वाटते. आणखी एका वृत्तात असेही म्हटले जात आहे की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल यांना अध्यक्षपद स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
Congress President Election Process Will Start Soon