नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पक्षाच्या नव्या अध्यक्षासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर, १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची आभासी बैठक झाली. त्यात हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी तसेच पक्षाचे खासदार राहुल गांधी उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाने नवा पक्षाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरपर्यंत नामांकन करता येईल. उमेदवारी अर्ज परत करण्यासाठी ३० सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबरला निवडणूक आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
गेल्या वर्षी काँग्रेस वर्कींग कमिटीने मंजूर केलेल्या वेळापत्रकानुसार, काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान पूर्ण करायची होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. आता अखेर अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर झाला आहे. अध्यक्षपदी गांधी घराण्यातील व्यक्तीच बसणार की या कुटुंबा बाहेरील व्यक्ती धुरा सांभाळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही,.
Congress President Election Declare Voting Counting
Politics Gandhi Family Sonia Rahul Priyanka