लासलगाव – राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी डॉ. विकास चांदरपाटिल यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री, बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशाने नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे निरीक्षक विनायकराव देशमुख, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर,गूणवंत होळकर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर नाना गिते, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संपतराव सकाळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संपतराव वक्ते, सुनील आव्हाड, स्वप्नील पाटिल, एकनाथ गायकवाड, शरद लोहकरे, निर्मलाताई खर्डे, सुनिता नगरे, रश्मीताई पालवे आदीसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ.विकास चांदरपाटिल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, जेष्ठाना,पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून काँग्रेस पक्षाची संघटनांत्मक बांधणी करण्यास प्राधान्य देणार असून काँग्रेस पक्षाचे ध्येय,धोरणे, विचार सर्व सामान्य माणसापर्यन्त पोहोचवून पक्ष वाढीसाठी व बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे. या निवडीबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,वनमंत्री विश्वजित कदम, आ.सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे ,माजी मंत्री शोभाताई बच्छाव, प्रदेश सरचिटणीस शरद आहेर, माजी आमदार अनिल आहेर, शिरीष कोतवाल, माजी जिल्हाअध्यक्ष राजाराम पानगव्हाने, जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण सभापती अश्वीनी आहेर, माजी पशुसंवर्धन सभापती शैलेश पवार, भारत टाकेकर यांनी स्वागत केले.