इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लांब केस आणि भली मोठी दाढी अशा लूकमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान दिसलेल्या राहुल गांधींचा नवा लूक समोर आला आहे. लंडनमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात पोहोचल्यानंतर राहुल यांचा नवा लूक सर्वांसमोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये राहुल गांधी हे डोक्यावरचे लहान केस आणि ट्रिम केलेली दाढी व मिशीमध्ये दिसत आहेत. तसेच, सर्वसाधारणपणे पांढरा टी शर्ट आणि पँटमध्ये दिसणारे राहुल गांधी आता कोट-टायमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेले राहुल गांधी हे आठवडाभराच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. तेथे ते केंब्रिज विद्यापीठात भाषण देणार आहेत. तेथील भारतीय नागरिकांशीही ते संवाद साधतील. केंब्रिज जज बिझनेस स्कूल (केंब्रिज जेबीएस) येथे व्हिजिटिंग फेलो म्हणून राहुल ’21 व्या शतकात ऐकणे-शिकणे’ या विषयावर व्याख्यान देतील.
केंब्रीज विद्यापीठाने म्हटले आहे की, “भारताचे आघाडीचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे आमच्या केंब्रिज एमबीए कार्यक्रमात स्वागत करताना खूप आनंद होत आहे,”.
https://twitter.com/IYC/status/1630772746266492928?s=20
Congress MP Rahul Gandhi New Look Phot Viral