इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोटाबंदीला ६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदीवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, हे २-३ अब्जाधीश मित्रांच्या फायद्यासाठी केले गेले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पीएम मोदींवर टीका करताना ‘PayPM’ असे लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अर्थव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.
राहुल गांधी हे पहिल्यापासूनच यावर आक्रमक आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला, त्यात लिहिले, “नोटाबंदी ही ‘PayPM’ ची जाणीवपूर्वक चाललेली चाल होती, जेणेकरून त्यांचे २-३ अब्जाधीश मित्र लहान आणि मध्यम व्यवसायांचे उच्चाटन करून भारताच्या अर्थव्यवस्थेची मक्तेदारी करू शकतील.”
भारतात नोटाबंदी ६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे, काळ्या पैशाला आळा घालणे आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा नष्ट करणे हा होता. तथापि, विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाला “आर्थिक नरसंहार आणि गुन्हेगारी कृत्य” असे म्हटले आहे.
नोटाबंदीला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने सांगितले की, मोदी सरकारच्या या निर्णयानंतर चलनात रोख ७२ टक्क्यांनी वाढली असून सरकारने त्यावर ‘श्वेतपत्रिका’ आणावी. पक्षाचे नेते गौरव वल्लभ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे हे भयंकर अपयश स्वीकारले पाहिजे. ते पत्रकारांना म्हणाले, “८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस सर्वांच्या स्मरणात असेल. भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या निर्णयाला आज सहावा वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदीला ५० दिवस उलटूनही आजपर्यंत सरकारने नोटाबंदीचे नावही घेतलेले नाही.”
वल्लभ यांनी दावा केला, “भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी संघटित लूट सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीच्या माध्यमातून केली होती.” ते म्हणाले, “अर्थव्यवस्थेतील रोख चलनात गेल्या सहा वर्षांत ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये अर्थव्यवस्थेत चलनात असलेली रोख रक्कम १७.९७ लाख कोटी रुपये होती, जी आज ३०.८८ लाख कोटी रुपये झाली आहे.”
https://twitter.com/RahulGandhi/status/1589916864830136320?s=20&t=NeHWxWbH4QQOhLZFDlf6XA
Congress MP Rahil Gandhi on Demonetisation 6 Years