नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकार विरोधकांची गळचेपी करत असल्याची ओरड होत असतानाच संसदेत काँग्रेसच्या एका आमदाराने सत्ताधाऱ्यांना तीन प्रश्न विचारून गप्प केल्याचा किस्सा घडला आहे.
लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी नव्हे तर गौरव गोगोई काँग्रेसकडून चर्चेला सुरुवात केली. यावेळी गोगोई यांनी सुरूवातीलाच मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर हिंसाचारावरून ३ महत्वाचे प्रश्न देखील विचारले. गोगोई यांनी सुरूवातीलाच सरकारवर प्रश्नांची तोफ डागताच लोकसभेत गोंधळ झाला. विरोधकांनी त्यांच्या प्रश्नाला समर्थन देत घोषणाबाजी सुरू केली.
दुसरीकडे गौरव गोगोई यांचे प्रश्न ऐकून सत्ताधाऱ्यांनी शांततेचा पवित्रा घेतला. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू करताना गौरव गोगोई म्हणाले,‘सरकारने आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्यास भाग पाडले आहे. हा प्रस्ताव लोकसभेतील सदस्यांच्या संख्याबद्दल नाही, तर मणिपूरच्या न्यायासाठी आहे. मी हा प्रस्ताव मांडतो की या सभागृहाने सरकारवर अविश्वास व्यक्त केला आहे. ‘इंडिया’ने मणिपूरसाठी हा प्रस्ताव आणला आहे. मणिपूरला न्याय हवा आहे.’
हे होते तीन प्रश्न
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ महत्वाचे प्रश्न विचारले.
त्यातील पहिला प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत?
दुसरा प्रश्न – मोदी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून का बोलत नाहीत? बोलले तर ३७ सेकंद का? बाकी मंत्री बोलतात, पण मोदी का बोलत नाहीत?
तिसरा प्रश्न – पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का काढून टाकल नाही? बाकी राज्यात आपण मुख्यमंत्री बदलले मग मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का बदलले नाही?
Congress mp Gaurav Gogoi Loksabha 3 Question PM Narendra Modi
Politics No confidence bjp Parliament Monsoon Session