मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जून महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. साहजिकच दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदारांची फोडाफोडी आणि घोडेबाजार सुरू होता. महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर जे काही सत्तानाट्य रंगलं ते सगळ्यांनीच पाहिले. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांमध्ये संख्याबळ नसताना भाजपाने अतिरिक्त उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीतील घोडेबाजाराबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. काँग्रेसच्या आमदारांनी पैसे घेऊन भाजप उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभव सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे, हा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
महाविकास आघाडीत आमदारांमध्ये असंतोष आहे असं भाजपानं त्यावेळी म्हटलं होतं. विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभव सहन करावा लागला. हंडोरे हे काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. राज्यात काँग्रेसचं संख्याबळ ४४ आहे. काँग्रेसचं दुसऱ्या क्रमांकाची मते भाई जगताप यांच्या पारड्यात टाकली होती. तसेच या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप निवडून आले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. या निकालात काँग्रेसची काही मते फुटल्याचं दिसून आले. त्यानंतर काँग्रेसनं याबाबत चौकशी करू असे म्हटले होते.
देशपातळीवर काँग्रेस नेतृत्वावरून पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यात गुलाब नबी आझाद यांनी राजीनामा देत पक्षातील निर्णय प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेस नेतृत्वाने आत्मचिंतन केले नाही, तर पक्षाचा पराभव होत राहील असे भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे चव्हाण म्हणाले की, राजकीय पक्षात लोकशाही आहे का? अजूनही आपण सरंजामशाही मानसिकतेतून बाहेर आलेलो नाही. आमच्या पक्षात लोकशाही आहे, काँग्रेसला १३५ वर्षाचा इतिहास आहे असं आम्ही अभिमानाने सांगायचो. परंतु इतर राजकीय पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत, एका कुटुंबाने चालवले आहेत तशी परिस्थिती आज काँग्रेसची झाली असून त्यामुळे काँग्रेसचा पराभव होत आहे.
चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत ७ आमदारांनी पैसे घेऊन भाजपाला मतदान केले. आम्ही ओरडून सांगितले. एका दलित कार्यकर्त्यावर अन्याय केला. कुणी यावर शासन केले पाहिजे. चौकशी केली पाहिजे. चौकशी करण्यासाठी माणूस पाठवला. चौकशी केली पण पुढेच काहीच झाले नाही असा आरोप त्यांनी केला. तसेच ज्या व्यक्ती दोषी होत्या त्यांचे दिल्लीत चांगले संबंध आहेत म्हणून कारवाई झाली नाही का? हे माहिती नाही असं सांगत चव्हाणांनी बंडखोर काँग्रेस आमदारांवर निशाणा साधला. त्याचसोबत आसाम, केरळात काँग्रेसचा पराभव झाला. तिथे अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात कमिटी केली. त्या कमिटीने अहवाल दिला. त्यावर पुढे काय झाले हे ही माहिती नाही असं त्यांनी म्हटले.
राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजपा या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला. कारण भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे
विधान परिषदेचा निकाल पाहता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मतांचा कोटा ठरवून दिला असताना प्रत्यक्षात मिळालेल्या मतांमध्ये फरक दिसला. काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली. हे निश्चितच गंभीर आहे. याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.
Congress MLA Vote to BJP Candidate in MLC Election
Politics EX CM Prithviraj Chavhan