नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना त्यांच्या डॅशिंग आणि रफ-टफ पर्सनालिटीसाठी ओळखले जाते. त्यामुळे त्यांचा लोकांमध्ये एक वेगळाच दरारा आहे. पण कधीकधी हा दरारा त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरतो. जवळपास सहा वर्षांपूर्वी त्यांनी एका ठिकाणी दाखविलेल्या हिसक्याचे परिणाम त्यांना आता भोगावे लागणार आहेत. त्यासाठी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सुनील केदार यांनी २०१७ मध्ये महापारेषणच्या सहायक अभियंत्यासह एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केळवद येथील तेलगाव येथे एका शेतातून महापारेषणचे टॉवर उभे करण्याचे काम सुरू होते. या कामात शेतकऱ्यांच्या पिकांचे तर नुकसान होतच होते, शिवाय यात नुकसान भरपाई देखील मिळत नव्हती. अश्यावेळी आमदार सुनील केदार यांच्यापर्यंत तक्रार केली. त्यांनी थेट संबंधित शेतकऱ्याचे शिवारच गाठले. आणि तिथे इंजिनीयर व महापारेषणचा कर्मचारी यांना मारहाण करीत काम बंद पाडले. केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज सहा वर्षांनी सत्र न्यायालयाने केदार यांना शिक्षा सुनावली.
एक महिन्याचा कालावधी
सुनील केदार यांनी जामीन मिळवला आहे. आणि त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी एक महिन्याला कालावधी देण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Congress MLA Sunil Kedar Court Order Imprisonment