नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेत लग्नाच्या जोरदार अफवा असलेली काँग्रेस आमदार आदिती सिंग यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली हा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा मतदारसंघ आहे. तेथीलच आमदार आदिती यांनी आता काँग्रेसचा हात सोडला आहे. २०१७ मध्ये त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. त्या विजयी झाल्या. त्यानंतर राहुल आणि आदिती यांच्या लग्नाच्या जोरदार अफवा होत्या. मात्र, आदिती या सातत्याने काँग्रेसवर टीका करत होत्या. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर त्यांनी हा प्रवेश केला असून त्यांना भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.