मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधानसभेसाठी काँगेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी समोर आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने ४८ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर दुस-या यादीत २३ जणांची नावे जाहीर केली आहे. तिस-या यादीत १६ जणांची नावे जाहीर झाली. त्यामुळे काँग्रेसचे दोन्ही यादी मिळून आता ८७ उमेदवार जाहीर झाले आहे. ९० जागा काँग्रेसच्या वाटयाला जाणार आहे. त्यामुळे ३ जागा अद्याप बाकी आहे. तिस-या यादीत नाशिक जिल्ह्यातील तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. त्यात चांदवड – शिरीषकुमार कोतवाल, इगतपुरी – लकी जाधव, मालेगाव मध्य – एजाज बेग यांची नावे आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांना संधी देण्यात आली. आता शरद पवार गटाचे ६७ उमेदवार जाहीर झाले आहे.
शिवसेनेच्या पहिल्या यादीत ६५ नावांचा समावेश होता. पण, त्यानंतर १ नाव सामना मध्ये वगळण्यात आले होते. त्यानंतर दुस-या यादीत १५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत ठाकरे गटाचे ७९ उमेदवार जाहीर झाले आहे. त्यानंतर तीन अजून नाव नंतर जाहीर करण्यात आले. त्यामुळे ही सख्या ८२ झाली आहे.
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गट ८२, काँग्रेस ८७ व राष्ट्रवादी शरद पवार गटाने ६७ उमेदवारांची यादी आतापर्यंत जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे आतापर्यंत २३६ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. अजून ५२ उमेदवारांची घोषणा बाकी आहे. यात १८ जागा या मित्रपक्षाला देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने ९०-९०-९० असा फॅार्म्युला निश्चित केला आहे. त्यात काही जागांची अदलाबदलही केली जाणार आहे.
मालेगाव मध्य – एजाज बेग
चांदवड – शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी – लकीभाऊ जाधव
खामगाव – राणा सानंदा
मेळघाट – हेमंत चिमोटे
गडचिरोली – मनोहर पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
नांदड दक्षिण – मनोहर अंबाडे
देगलूर – निवृत्तीराव कांबळे
मुखेड – हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
भिवंडी पश्चिम – दयानंद चोरघे
अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
वांद्र पश्चिम – असिफ झकारीया
तुळजापूर – कुलदीप पाटील
कोल्हापूर दक्षिण – राजेश लाटकर
सांगली – पृथ्वाराज पाटील