मुंबई – महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज एक पत्र दिले आहे. विधीमंडळातील नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीने हे पत्र देण्यात आले आहे.
यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनीच माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना केंद्र सरकारने ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने यातील २५ टक्के हिस्सा अदा करण्याची हमी द्यावी, अशी मागणी पत्रात केल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. बघा, त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/bb_thorat/status/1463482303393382404